Home

 

मराठी विभाग

                काकासाहेब चव्हाण  महाविद्यालयाच्या  मराठी विभागाची स्थापना १९७१ मध्ये झाली. डॉ. स. ग. यादव, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रा. संजय सुतार, प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांसारख्या मराठी साहित्य समीक्षा क्षेत्रातील दिग्गज मराठी विभागप्रमुखांची परंपरा या विभागाला लाभलेली आहे.
*  सध्या मराठी विभागामध्ये प्रा. डॉ. गवराम पोटे हे मराठी विभागप्रमुख आहेत.
    प्रा. डॉ. हेमंत कुंभार  आणि प्रा. डॉ. राजेंद्र लादे  हे दोघे तासिका तत्त्वावरती कार्यरत आहेत.  
*  महाविद्यालयाचा मराठी विभाग ५३  वर्षे जुना आहे.
*  प्रथम वर्ष ते तृतीय वर्षापर्यंत मराठीच्या एकूण १६ अभ्यासपत्रिकांचे अध्यापन केले जाते.
*  मराठी विभागाने आतापर्यंत विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चासत्र, कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
*  विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असते.
*  विभागातील अनेक माजी विद्यार्थी पत्रकारिता, नाटक, चित्रपट, शिक्षण, साहित्य, राजकारण, क्रीडा क्षेत्रात    

     झळकत आहेत.

मराठी भाषा साहित्याविषयी :-
*  मराठी साहित्य या विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये 'साहित्यिक ज्ञानक्षमतानिर्माण होते.
*  विद्यार्थ्यांची वैचारिक व सामाजिक जाणीव प्रगल्भ होते.
*  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C.) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (U.P.S.C.) या स्पर्धा परीक्षांमध्ये   

     मराठी विषयाची १०० गुणांच्या अभ्यासपत्रिकेची पूर्ण तयारी मराठी साहित्य या विषयामुळे होते.
*  मराठी साहित्य या विषयामुळे भाषांतर, मुद्रितशोधन, पत्रकारिता ( प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मिडिया),   

    सूत्रसंचालन, जाहिरातलेखन, पटकथा, संवादलेखनवृत्तनिवेदन, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रात कार्य करण्याची संधी    

     प्राप्त होते.
*  नाटक, चित्रपट, लोककला, लोकसाहित्य, भाषाशास्त्र, बोलीभाषासाहित्य इ. क्षेत्रात संशोधन आणि कार्य

    करण्याची संधी.

भाषेतील प्रकाशाचा अनुभव उपनिषद्कारांनी  वर्णन केला आहे तसाच संत ज्ञानेश्वरांनीही तो अनुभव वेगळ्या प्रकारे वर्णन केला आहे. ते लिहितात :


"जैसे बिंब तरी बचकेंएवढें|  परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ||

शब्दांची व्याप्ती तेणें पाडे|  अनुभवावी||"(ज्ञानेश्वरी: अध्याय ४, ओवी २१५)
या ओळीतील  दृष्टांतातून ज्ञानेश्वरांनी भाषेतील  प्रकाशतत्वाचे  सूचन  केले आहे. तेव्हा सध्याच्या स्थित्यंतरातून जाताना  भाषेच्या अंगचा अमीट प्रकाश आपल्याला दिशा देईल असा दृढ विश्वास बाळगूया.
माऊली असेही म्हणतात, माझ्या मराठी भाषेचे मोठेपण मी काय सांगू?
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। ज्ञाने. ६/१४


अमृतालाही पैजेवर  जिंकणारी अक्षरेअशी अमृत भाषा मराठी.
भाषा ही व्यक्तीसाठी भावजीवनाची अस्तर आहे आणि समाजासाठी संस्कृतीची वाहक आहे. अशी ही मराठी भाषा मुळात सर्वस्पर्शी आहे.
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषामातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतोवाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. उत्तमोत्तम मौलिक आणि प्राचीन ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ विभागात आहेत.

No comments:

Post a Comment

home

home